काळेगाव ,दि. २७ :
दि . २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इयत्ता १० वी मध्ये प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक पटकाविणा-या विद्यार्थ्यांसह विशेष गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा बळीराजा रक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था येवती अध्यक्ष ॲड आशिष दिनकरराव पाटील, सचिव. दिनकर विश्वासराव पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
तुळजापूर तालुक्यातील येवती माध्यमीक विद्यालय शाळेवर प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांचा ५०१ रुपये , प्रमाणपत्र , सन्मान चिन्ह देवुन गैवरविण्यात आले. तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपञ देण्यात आले.
गेलल्या चार वर्षेपासुन संस्थेच्या वतीने ऑड.आशिष पाटील व दिनकर पाटील यांनी हा गुणवंतांचा सत्कार करुन प्रोत्साहन देत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनस ठेवून कार्यक्रम पार पडले. गावकरी सरपंच उपसरपंच चेअरमन यांनी कामांचे कैतुक करुन यापुढे असेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न असे उपक्रम राबविण्याची आपेक्षा व्यक्त केली.
ऑड.आशिष पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दिनकर पाटील यांनी आमचे शाळेतुन शिकलेले विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत व शाळेचे, गावचे नाव राज्यात चमकवावे व मुलांमधे बक्षीस मिळविण्याची ओढ निर्माण हावुन चांगलें मार्क मिळवून स्पर्धेच्या युगात टीकले पाहिजे असे सांगितले.
यावेळी माध्यमिक विद्यालय येवतीचे मुख्याद्यापक कुलकर्णी व शाळेतील संपूर्ण टिचिंग व नॉन टिचिंग स्टाफ , सरपंचपती अमोल गवळी, उपासरपंच प्रीतम गायकवाड ,
पोलीस पाटील दिनकर विश्वासराव पाटील
अनिल शिंदे ,मन्मथ मुडके , बाजीराव पाटील , जयवंत पाटील , मारुती शिंदे , मारुती तांबे व शाळेचे माजी विद्यार्थी व गावातील इतर नागरिक उपस्तित होते.