काटी , दि . २६ :
तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित बिनविरोध झालेल्या निवडणुकीत चेअरमन, व्हाइस चेअरमन यांच्यासह संचालकांचा सुरतगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात तुळजापुर पंचायत समितीचे माजी उसभापती दत्ता शिंदे यांच्या वतीने बुधवार दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाल, श्रीफळ, देऊन सत्कार करुन करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यात नवनिर्वाचित चेअरमन भागवतराव गुंड, व्हाईस चेअरमन नानासाहेब गुंड, तसेच बिनविरोध संचालक धर्मराज गुंड, शिवाजी गुंड, अभिमान्यू काळे, मोहन नकाते, पांडूरंग गुंड, मरगू देवकर,संदिपान गुंड,नवनाथ सुरते, लक्ष्मीबाई गुंड, मंगलबाई गुंड, रविंद्र कुंभार, यांचा समावेश होता.
यावेळी सोसायटीचे सर्व नुतन संचालकांसह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आण्णासाहेब गुंड, प्रमोद गुंड, विठठल गुंड, सुरेश गुंड,राम गुंड, विजय देवकर,बापूसाहेब गुंड, गणेश गुंड, पंडीत काळे,चंद्रकांत माळी, सचिन गुंड,हरीदास गुंड, विलास पाटील ,, सौदागर गुंड, राजकुमार गुंड यासह गावातील नागरीक उपस्थित होते.