वागदरी , दि . २६
नळदुर्ग येथील नव्याने सुरु होणाऱ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या तिसऱ्या लटेच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथील डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) नळदुर्ग शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (पूर्वीचा ९) वर वसलेले ऐतिहासिक नळदुर्ग हे जवळपास ६५ गावांच्या केंद्रस्थानी असून मुंबई, पुणे, सोलापूर, नळदुर्ग ते हैदराबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग नळदुर्ग शहरातून जातो.
या महामार्गावर आपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे सर्व सुविधा असलेले एखादे रुग्णालयल असावे अशी जनतेची मागणी होती. या मागणीचा विचार करून अणदूर, नळदुर्ग, तुळजापूर रोडला जोडणाऱ्या गोलाई चौका नजीक नळदुर्ग तुळजापूर रोडवर शासकीय उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यासाठी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच याठिकाणी आरोग्य सेवा सुरू करण्यात येणार आहे.
याठिकाणी शासनाच्या वतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करून डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये रुग्ण सेवेसाठी नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी, डॉ एम.ए. ईजापवार, परिसेविका निर्मला तोडकर, आधिपरिचारीका मेघा काळे, एस.डी.सुतके,लँब टेक्नेशियन यु.सी.डिग्गे ,वार्डबाँय शिवाजी गायकवाड, आदी आरोग्य कर्मचाऱ्यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड म्हणाले की नळदुर्ग येथे लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सुरू करण्यात यावी अन्यथा यासंदर्भात रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
यावेळी रिपाइंचे मराठवाडा विभाग कार्यकारणी सदस्य दुर्वास बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, तालुका संघटक सुरेश लोंढे, भाजपा प्रसिद्धी विभाग तालुका अध्यक्ष तथा पत्रकार किशोर धुमाळ,रिपाइं नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे,जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव बनसोडे, विठ्ठल बनसोडे,युवा कार्यकर्ते अनिल लोंढे सह कार्यकर्ते उपस्थित होते.