वागदरी  , दि . २६ : एस.के.गायकवाड


भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या  वर्धापन दिना निमित्त मौजे वागदरी ता.तुळजापूर येथे विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले.

  जि.प.प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येते दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ध्वजारोहणाच्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष रामसिंग परीहार, उपाध्यक्ष विजयाबाई वाघमारे, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे यांच्या हस्ते महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्याध्यापिका महदेवी जत्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रा. प.सदस्य दत्ता सुरवसे, महादेव बिराजदार, रिपाइंचे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकूर,आदींच्या हस्ते पुजन करून सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामुदायिकरित्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.


  तसेच येथील भिम नगरमध्येही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले. प्रारंभी मुख्याध्यापिका महादेवी जत्ते,सरपंच ज्ञानेश्वर बिरजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे,तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंग ठाकूर,उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रा. प.सदस्या विद्या बिरादार, बकुलाबाई भोसले,कमलबाई धुमाळ, महादेव बिराजदार सह ग्रामस्थ,युवा कार्यकर्ते,महिला  उपस्थित होते.
 
Top