चिवरी , दि . ३१ : राजगुरू साखरे :
शेतीचे कामे बैलाच्या सहाय्याने करण्याऐवजी बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत .एकरभर क्षेत्रासाठी गेल्यावर्षी बाराशे रुपये असलेला ट्रॅक्टरच्या नांगरणीचा भाव यावर्षी डिझेल दरवाढीमुळे पंधराशे ते सोळशे रुपयापर्यंत पोहचला आहे.
गेल्या काही दिवसापासून डिझेल पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असून डिझेल नव्वद रूपयाच्या आसपास तर पेट्रोल शंभर रुपये लीटर झाल्याने भाव वाढ झाली आहे.ऐकिकडे बैलची संख्या अतिशय कमी झाल्याने सर्व शेतकरी वर्गांचा ट्रॅक्टरने शेती करण्यावर भर आहे मात्र आता डिझेलचे भाव वाढल्याने शेतकर्यांना शेती करण्यासाठी मोठी आर्थिक कसरत करावी लागणार आहे.दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत असल्याने सर्वसामान्याचे जगणे मुश्किल झाले आहे.शहरी भागात जसे नागरिकणा इंधन दरवाढीने मेटाकुटीला आणले आहे.तसे शेतक-यांचीही चिंता वाढवली आहे. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही वाढली आहे. साधारणपणे २०० ते १ हजार रुपयापर्यंत वाढ झाल्याने एकरी मशागतीच्या खर्चाने हैराण झालेल्या डिझेल दरवाढीमुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे .शेतीमध्ये जास्तीस जास्त ट्रॅक्टर ,रोटव्हेटर,यांचा वापर वाढला आहे.डिझेलची किंमत आता पेट्रोलच्या जवळपास येऊन ठेपली आहे.दोन्हीमद्धे थोडेच अंतर राहिले आहे.ऐकुणच पेट्रोलच्या पाठोपाठ डिझेलच्या किंमती वाढल्याने यांचे गंभीर परिणाम सर्वसामान्याना सोसावे लागत आहे .अगोदरच कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या जनतेला आता पेट्रोल डिझेलच्या महागाईला तोंड द्यावे लागत आहे.
प्रशांत बोडके , शेतकरी .
गेल्यावर्षीच्या तुलनेत डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.एकीकडे बैलंची संख्या कमी झाली आहे.शेतीचे सर्व कामे ट्रॅक्टरवर करावी लागत त्यामुळे गेल्यावर्षी पेक्षा यंदा चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली त्यामुळे सध्या शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसत आहे.