उमरगा , दि . ३१

         
 राज्यात घडणारे दररोजचे अपघात गंभीर आजार अशांना रक्ता अभावी प्राण गमवावे लागते तेंव्हा रक्ताचा तुटवडा ही राज्यासमोरील गंभीर समस्या असून या समस्येवर मात करण्यासाठी  रक्तदानाची चळवळ उभारणे ही काळाची गरज असल्याचे स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी व्यक्त केले.



लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयामधे कर्मयोगी शेखर उर्फ भाऊसाहेब आंबेकर यांनी आपल्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त १०० वा रक्तदान सोहळा साजरा केला. यावेळी  आंबेकर स्वागत समिती व सास्तूर नगरीच्या वतीने  अंबेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी  रमाकांत जोशी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आपले विचार व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ॲड रावसाहेब पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनिल साळूंके,  लोहारा नगरपंचायत सदस्य जालींदर कोकणे ,  संजय गोडसे, देविदास गोपणे , सांगोला पोलिस निरीक्षक सुनिल काकडे व प्रसिद्ध लेखक  प्रा फ.म शहाजीदे हे उपस्थित होते.


यावेळी  शहाजींदे यांनी अंबेकर यांनी १०० वेळा रक्तदान करून सास्तूरचे नाव राज्यात प्रसिद्ध केले आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा  सुनिल सांळुके यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतांना जरूर आम्ही अंबेकरांचा आदर्श घेवुन काम करू यावेळी जालींदर कोकणे देविदास गोपणे यांनी अंबेकरांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सुभेच्छा दिल्या.
यावेळी  अंबेकर यांनी शासनाने शासकीय कर्मचा-याना दर 3 महिन्यास  रक्तदान करण्याचा आदेश काढावा जेणेकरून रक्त तुटवड्याची समस्या कायमची संपेल.


यावेळी १८ युवकांनी रक्तदान करून अंबेकरांना सुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित कोथिंबीरे यांनी तर आभार  बालाजी नादरगे यांनी केले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सास्तूरचे सरपंच व समितीचे स्वागताध्यक्ष्  यशवंत कासार सदस्य सुनिल शिंदे , अशिष वाघमारे , धीरज बेळबकर, नाट्य अभिनेते वाय एस शिंदे , वाघंबर सरवदे ,चंद्रकांत जगदे ,श्रीमंत सुर्यवशी शिवसेना शाखा प्रमूख मुरली पवार ,श्रीकृष्ण रक्तपेढीचे व स्पर्श रुग्णालयातील  सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
 
Top