काटी , दि . ३०
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील इंदिरानगर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रविवार दि. (30) रोजी शाळेतील विद्यार्थ्यीनी कु. सलोनी बंडगर हिच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
शाळेचे सहशिक्षक ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी महात्मा गांधी यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची माहिती सांगितली. विध्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी यांच्याविषयीं मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यपिका श्रीमती अश्विनी काळदाते ,सहशिक्षक ज्योतिर्लिंग क्षिरसागर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.