नळदुर्ग , दि . ३०
शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक दत्तात्रेय शिवशंकर आलुरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सोमवार दि . ३१ जानेवारी रोजी नळदुर्ग येथे सत्कार आयोजित करण्यात आले आहे.
अणदुर ता.तुळजापूर येथिल राहणारे आलुरे हे दि .७ फेब्रुवारी १९८६ रोजी जकेकुर ता. उमरगा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणुन रुजु झाले. सुमारे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर ते दि. 31 जानेवारी 2022 रोजी नळदुर्ग जि. प .के .प्रा.शाळेतुन सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन 2009 पासून ते सेवा निवृत्ती पर्यंत मुख्याध्यापक म्हणून चांगले कार्य त्यांनी बजावले आहे. तर त्यांनी 2016 ते 2018 पर्यंत अणदूर ता. तुळजापूर येथील केंद्राचा अतिरिक्त कार्यभार ही चांगल्या प्रकारे सांभाळला आसल्याने शिक्षकांमध्ये त्यांच्या चांगल्या कार्याची छटा उमटली आहे तर सन 2019 ते 2022 पर्यंत नळदुर्ग केंद्राचा अतिरिक्त केंद्रप्रमुखाचा कार्यभार ही त्यांनी उत्तम रित्या सांभाळल्या बद्दल केंद्रातील शिक्षकांनी त्यांचा भव्य असता निरोप समारंभ व सेवा निवृत्तीबद्दल सत्कार समारंभ आयोजित केला आहे. 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी हजारो विद्यार्थी घडवण्याबरोबर सर्व आपल्या शिक्षक बांधवांसोबत चांगल संबंध जोडून शिक्षकांमध्ये मित्रत्वाला जागणारा मुख्याध्यापक अशी ख्याती त्यांनी मिळविली आहे. दरम्यान दि. 31 जानेवारी रोजी होणाऱ्या सत्कार समारंभात दत्तात्रेय आलुरे गुरुजीचा यांचा भव्य असा सत्कार करण्यात येणार आहे शिवाय या सत्कार समारंभासाठी नळदुर्ग केंद्राबरोबर तालुक्यातील शिक्षक उपस्थीत राहणार आहेत. त्यांनी जकेकूर, काटगाव, अणदुर, देवसिंगा तुळ, नळदुर्ग येथे मुलांची प्रशाला आणि केंद्रीय प्राथमिक शाळा येथे आपली सेवा बजावली आहे. दरम्यान दत्तात्रेय आलुरे गुरुजी यांच्या सेवा निवृत्ती बद्दल आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास तालुक्यातील शिक्षक व केंद्रातील शिक्षक आणि शिक्षक प्रेमी नागरीकांनी उपस्थीत रहावे असे आवाहन सत्कार समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.