तुळजापूर , दि . १५
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील पाचव्या माळेदिनी शुक्रवार दि .१४ रोजी जलयाञा पारंपारिक पध्दतीने सामाजिक अंतर पाळुन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .
शुक्रवार पहाटे इंद्रायनी देवीची पुजा करण्यात आल्यानंतर पापनाश तिर्थकुंडातील पवित्रजल चांदीच्या कुंभात घेवून त्याचे विधीवत पूजन व इंद्रायनी देवीचे पुजन यजमान प्रविण कदम त्यांची सौभाग्यवती मंजुषा कदम यांच्या हस्ते मंहत तुकोजीबुवा, मंहत मावजीनाथ, प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर तो जलकुंभ यजमानाचा डोक्यावर देण्यात आला. सकाळी ७ वाजता या जलयात्रा मिरवणुकीस प्रारंभ झाला . या पुजेचे पौरोहित्य उपाध्य बंडु पाठक सह बृम्हवृदांनी केले .
या जलयात्रेत सजविण्यात आलेल्या खास वाहनात शाकंभरी देवीची प्रतिमा ठेवण्यात आली. या प्रतिमेस हिरव्या फळे ,पालेभाज्या यांचा हार तयार करुन घालण्यात आला होता.
या वाहनाचा अग्रभागी यजमान प्रविण कदम सपत्निक तसेच महंत तुकोजीबुवा , महंत हमरोजीबुवा , मंहत वाकोजीबुवा , जि.प.उपाध्यक्ष अर्चना पाटील , धार्मिक सहाय्यक व्यवस्थाक नागेश शितोळे लेखापाल सिध्देश्वर इंतुले ,विश्वास परमेश्वर आदी फेटे घालून सहभागी झाले होते .
संबळाच्या कडकडाटात बॅण्डच्या गजरात नगारा चौघडा आदी पारंपारिक वाद्याच्या गजरात आई राजा उदो उदोऽऽ च्या जय घोषात कुंकवाची उधळण करीत ही जलयाञा मार्गस्थ झाली .
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर भवानी रोड मार्ग , राजे शहाजी महाद्वार चौकात आल्यानंतर श्री कल्लोळ तिर्थकुंड व गोमुख तिर्थकुंड येथे जलपुजन करुन राजे निंबाळकर दरवाजातुन मुख्य मंदीरात प्रवेश केले.
नंतर देवीची आरती करण्यात आल्यानंतर सुवासनिनी आणलेल्या जलाने मंदिर स्वच्छत करण्यात आले.
त्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने यजमान सौ.व.श्री मंजुषा प्रविण कदम तहसिलदार योगिता कोल्हे, नागेश शितोळे यांच्या हस्ते सहभागी कुमारीका व सुवासनीची खणा - नारळाने ओटी भरून सन्मान करण्यात आला . आज देविजींचा सिंहासनावर शेषशाही अलंकार महापुजा मांडण्यात आली होती