उस्मानाबाद , दि . १५ : 

 उस्मानाबाद तालुक्यातील गोगाव, नांदुर्गा  विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मंदोदरी माणिक रोकडे यांची निवड करण्यात आली असून व्हाईस चेअरमन पदी शशिकांत वामन खटके यांची निवड करण्यात आली आहे.



 दि.26 डिसेंबर रोजी संचालक मंडळ मतदान प्रक्रिया पार पडली, नुकताच त्याचा निकाल जाहीर होऊन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवड झाली आहे, माणिक रोकडे आणि लक्ष्मीकांत खटके या पॅनल प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंकर शेतकरी विकास पॅनलने घवघवीत विजय मिळवला आहे. तर संचालक पदी पद्मिन विलास रोकडे, धनंजय मुरलीधर सुरवसे, तानाजी सोपान भोसले, एकनाथ कृष्णा सगट, श्रीरंग गणपती डावकरे, रामकिसन खटके, गजेंद्र खटके, भानुदास कोळी यांनी विजय मिळवला आहे, गोगाव, नांदुर्गा परिसरातील शेतकरी सभासदांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
 
Top