वागदरी , दि . १५ : एस.के.गायकवाड

   शुक्रवार दि. १४ जानेवारी  रोजी तुळजापूर  येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या नामविस्तार दिनाचा २८ वा वर्धापन दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)  यांच्या वतीने साजरा करण्यात आला. 
   

प्रारंभी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम ,  तुळजापूर विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठ नामविस्तारासाठी  आपल्या प्राणाची आहुती देऊन नामविस्तार घडवून आणले . त्या सर्व नामांतर योद्द्याना
श्रद्धांजली अर्पण करून नामविस्तर दिन उत्साहाने व फटक्यांची आतिषबाजी करून साजरा करण्यात आला.
 
 याप्रसंगी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांनी मराठवाडा विद्यापीठ नामविस्तारा लढ्याबाबत  मनोगत व्याक्त केले.
  यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष अरुण कदम, तालुका सल्लागार तानाजी  कदम, रिपाइं श्रमिक आघाडीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब कदम,  कार्यकर्ते प्रताप कदम, तानाजी डावरे, धम्मा भालेकर, पप्पु कदम, पोपट वाघमारे,सुरेश चौधरी, हणमंत विटकर,भेइराव कदम ,गोपाळ सोनवणे, अविनाश कदम, धम्मशील कदम, मिटू जानराव, महेश कदम,दत्ता हावळे, धनंजय जानराव, तानाजी हवळे, भागवत कदम, प्रा.अशोक कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित  होते.
 
Top