तुळजापूर, दि.१४,
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा नामविस्तार दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या नामांतरासाठी खुप संघर्ष करावा लागला, आजमितीला एकुण ४०६ महाविद्यालये एकट्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातंर्गत येतात. बहुजन,दिन दलित समाजातील युवकांना शिक्षणाचे ,ज्ञानाचे आणि संस्कारांचे व्यासपीठ विद्यापीठाच्या माध्यमातून प्राप्त झाले,शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण आपण विसरता कामा नये, शिक्षणामुळे अस्मिता बोध होतो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. याचा अर्थ असा की,शिक्षित व्यक्ती शिक्षित असुन देखील अधिकारांपासुन ,ज्ञानापासून जर दूरच रहात असेल तर त्या व्यक्तीच्या शिक्षित असण्याला अर्थ नसतो असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . आशपाक आतार यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करण्यात आले.