तुळजापूर , दि . १५ :
पंचायत समिती, तुळजापूर येथील लेखाधिकारी राम राठोड व गटशिक्षण कार्यालय तुळजापूर येथील वरिष्ठ सहाय्यक श्रीमती संगीता दुधभाते यांचा जुनी पेन्शन संघटना शाखा तुळजापूरच्या वतीने सत्कार करण्यात आला. राठोड हे दि .31 डिसेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल व श्रीम. दुधभाते यांची वरिष्ठ सहाय्यक पदावरून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पशुसंवर्धन विभाग उस्मानाबाद येथे पदोन्नती झाल्याबद्दल जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने सिडीपीओ,तुळजापूर हावळे , प स कक्ष अधिकारी श्रीम.मगर व गटशिक्षण कार्यालय तुळजापूर शिक्षण विस्ताराधिकारी डॉ.वाय. के.चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सागर शिवाजी राठोड (मयत शिक्षक बंधू शिवाजी राठोड यांचा मुलगा ) यांची अनुकंपाने ग्रामसेवक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. राम राठोड यांना सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि श्रीम. संगीता दुधभाते व श्री. सागर राठोड यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पंचायत समितीतील वाघ , कट्टे , जिल्हा सल्लागार तुकाराम वाडकर, जुनी पेन्शन संघटना तुळजापूरचे तालुकाध्यक्ष सुसेन सुरवसे, पेन्शन शिलेदार बाळासाहेब घेवारे, केशव काळे, बालासाहेब चिवडे, ज्योतिर्लिंग क्षीरसागर, सोमनाथ केवटे, धनंजय ठोंबरे, बलभीम भोयटे, अमीन मुलाणी, बापू चेपटे, बाबासाहेब मोरे तसेच ज्येष्ठ शिक्षक धोंडिबा गारोळे, अनंत फुलसुंदर व गटशिक्षण कार्यालयातील सहाय्यक मल्लया स्वामी हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घेवारे यांनी तर सूत्रसंचालन केशव काळे यांनी व आभार तालुकाध्यक्ष सुसेन सुरवसे यांनी मानले.