नळदुर्ग , दि .१४
येत्या दोन दिवसात बॉयलर प्रेशरवर घेऊन सर्वच चाचण्या घेणार आहे. सर्व हॉयड्रालीक चाचणी घेऊन १० ते १२ दिवसात गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर कामकाज सुरु आहे. श्री तुळजाभवानी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा मानस आहे. कारखान्याचे सर्व जुने कामगार बोलावून घेऊन कामकाज सध्या प्रगतीपथावर असल्याचे तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिलराव चव्हाण यांनी "तुळजापूर लाईव्ह " दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी बोलताना सांगितले.
शुक्रवार दि. 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधुन "तुळजापूर लाईव्ह" च्या सन 2022 या दिनदर्शिकेचे प्रकाशन काँग्रेस प्रदेश सचिव तथा श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनिलराव चव्हाण यांच्या हास्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी तुळजापूर लाईव्ह मित्र परिवाराच्या वतीने संपादक शिवाजी नाईक, आरंभ संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे यांच्या हस्ते सुनिलराव चव्हाण यांचा शाल, फेटा, बुके, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनिलराव चव्हाण यानी दिनदर्शिकेबाबत कौतुक करुन तुळजापूर लाईव्हच्या वाटाचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले, उद्योजक मनिष हजारे, माजी पंचायत समिती सभापती बालाजी मोकाशे , माजी नगरसेवक सुधीर हजारे , बसवराज धरणे, नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष आयुब शेख , छायाचित्रकार प्रशांत देशमुख, राहुल हजारे , कारखान्याचे सिव्हिल इंजिनिअर आानिल अगरखेडकर , चिफ इंजिनिअर धनंजय दानाई, निलय्या स्वामी यांच्यासह कारखान्यातील आधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक भैरवनाथ कानाडे यांनी तर आभार आयुब शेख यानी मानले .