नळदुर्ग ,दि . १३


येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण होऊन जवळपास  दोन वर्ष होत आहेत, वास्तविक पाहता संचालक मंडळाची मुदत संपण्यापुर्वी  ही निवडणूक घेणे बंधनकारक होते, परंतु कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु आता सर्वत्र सहकारी संस्थेच्या निवडणुका होत आहेत,त्याच पार्श्वभूमीवर नळदुर्ग  विविध कार्य.सेवा सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम घ्यावा,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,

निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांच्या स्वाक्षरी आहेत.



 
Top