वागदरी , दि . १२ : एस.के.गायकवाड


परिवर्तन सामाजिक संस्थेचे नुतन संचालक संदेश मारुती बनसोडे यांना पुणे येथील सोशल रिस्पॉन्सिबिलीटी समुहाकडून दिला जाणारा विवेकानंद रत्न हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. त्याबद्दल बनसोडे यांचे आभिनंदन होत आहे.


 पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे एका कार्यक्रमात सदर पुरस्काराने  बनसोडे याना सन्मानित करण्यात आले आहे.
 सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तथ रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, पत्रकार किशोर धुमाळ, डी.बी.एन.चे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, सह मित्र परिवाराच्या वतीने आभिनंदन करण्यात आले.
 
Top