काटी ,  दि . १२

तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नाना उद्धव सुरडे तर उपाध्यक्षपदी राम सुरडे यांची निवड करण्यात आली.  


नांदुरी केंद्राचे केंद्र प्रमुख संजय वाले, शाळेचे मुख्याध्यापक शेकू जेटीथोर, शिक्षक,पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी   झालेल्या पालक बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली.  याप्रसंगी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देऊन  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन अध्यक्ष  सुरडे  यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, यापुढे  सर्वं पालकांना व शिक्षकांना सोबत घेऊन शाळेचा व शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.


या कार्यक्रमा प्रसंगी केंद्र प्रमुख संजय वाले, शाळेचे मुख्याध्यापक शेकू जेटीथोर, सर्व शिक्षक, सर्व नुतन शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, यांच्यासह पालक उपस्थित होते.
 
Top