जळकोट, दि.१२


       
  तुळजापूर तालुक्यातील होर्टी केंद्र अंतर्गत असणाऱ्या जळकोटवाडी (नळ) येथे   राजमाता  जिजाऊ  व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दि १२ जानेवारी रोजी    जि. प. प्रा. शाळेत  जिजाऊ  व युगपुरुष स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतीमेचे पुजन  गावचे सरपंच  शिवाजी कदम व ग्राम पंचायत सदस्य नागनाथ साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. 


  राष्ट्रमाता जिजाऊ  यांच्या कार्याविषयी मुख्याध्यापक उमेश भोसले यांनी   विचार व्यक्त केले. तसेच युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी सहशिक्षक  अशोक राठोड यांनी आपले विचार मांडले.राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची ऑनलाइन रांगोळी स्पर्धा  व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top