नळदुर्ग , दि . ०२
नळदुर्ग शहरामध्ये खुलेआम ऑनलाईन चक्री (जुगार) चालु असल्याने अनेकजण  झटपटआधिक पैसे मिळविण्याच्या मोहापायी कंगाल होत आहेत. पोलिस प्रशासनाने त्वरित आॕनलाईनचा हा जुगार बंद करण्याची मागणी नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्यावतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नळदर्ग शहरामध्ये जवळपास 12 ते 17 ठिकाणी ऑनलाईन चक्री (जुगार) खेळवला जात आहे. या जुगारामुळे तरूण पीढी बरबाद होत आहे. त्याचबरोबर  अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दररोज ऑनलाईन जुगारामुळे लाखो रुपयेची उलाढाल होत आसुन हे ऑनलाईन चक्री (जुगार) चालवणारे माला माल होत आहे. तर खेळणारे मात्र कंगाल होत आहेत. त्यामुळे शहरात चालू आसलेला हा ऑनलाईन चक्री (जुगार) बंद होणे आत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.



शहरातील अक्कलकोट रोड व डि.एड कॉलेज परिसरात जवळपास 15 ते 17 ठिकाणी ऑनलाईन चक्री (जुगार) खेळविणारे आड्डे राजरोस चालू आहेत त्यामुळे हे ऑनलाईन चक्री (जुगार) आड्डे तात्काळ बंद करुन तरुण पिढीला बरबाद होण्यापासून वाचवावे अनेकांच्या संसाराची होणारी होळी  थांबविण्याची मागणी  नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एम एम शहा यानी निवेदन स्विकारले.


निवेदनावर नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, उपाध्यक्ष श्रीनिवास भोसले, आयुब शेख, सचिव सुनिल गव्हाणे, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे, प्रसिध्दि प्रमुख शिवाजी नाईक, पत्रकार सदस्य विलास येडगे, सुनिल बनसोडे, दादासाहेब बनसोडे, तानाजी जाधव, लतिफ शेख, जहिर ईनामदार, उत्तम बनजगाळे, अजित चव्हाण, शोएब काझी, संतोष नाईक, मु‌ज्जमीर शेख आदिंच्या निवेदनावर सह्या आहेत.

अन्यथा पोलिस ठाण्यासमोर पञकार करणार उपोषण - पञकार सुनिल बनसोडे

येत्या  शुक्रवार पर्यंत नळदुर्ग मधील आॕनलाईन  जुगार बंद न झाल्यास पञकार संघटनेच्यावतीने उपोषण करणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक एम एम शहा यांच्याशी बोलताना पञकार सुनिल बनसोडे यांनी सांगितले .


ज्योतीबा येडगे ,  मनसे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष  
नळदुर्ग येथे सुरु असलेल्या आॕनलाईन जुगार प्रकरणी यापुर्वीच पोलिस प्रशासनास  निवेदन देवुन हा बेकायदेशीर धंदा बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेने केले होते. माञ याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आॕनलाईन जुगाराचा खेळ बंद न झाल्यास यापुढे मनसे स्टाईलने आदोंलन करणार असल्याचे येडगे  सांगितले.
 
Top