होर्टी , दि . ०२ : बाळासाहेब मुळे

तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात रविवारी दर्शवेळ अमावस्येचा (येळवस) सण उत्साहात साजरा झाला. शेतकऱ्यांसह शहरी कुटुंबीयांनी गावात येऊन येळवशीच्या वनभोजनाचा आनंद लुटला. त्यामुळे रविवारी दिवसभर होर्टी गावात शुकशुकाट दिसून आला. 


दर्शवेळा अमावस्या (येळवस) हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण आहे. होर्टी गावात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीय हजेरी लावतात. मित्र व नातेवाइकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. आज सकाळपासून शेतीकडे जाणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. परिणामी गावात दिवसभर शुकशुकाट होता. 


शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून पाच पांडवांची पूजा तसेच सायंकाळी उत्तरपूजा केली जाते. त्यानंतर बालगोपाळांसह महिलांनीही येळवशीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, अंबिल, बाजरीचे उंडे, खीर, धपाटे, तिळाची पोळी आदींसह रानमेव्याचा होर्टी गावातील शेतकऱ्यांनी आस्वाद घेतला.

 
Top