नळदुर्ग , दि . १३

 दि.१६ जानेवारी २०२२ रोजी नळदुर्ग  येथे संपन्न होणारे सातवे बौद्ध साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जे निर्बंध  जारी केले आहेत . त्याचा विचार करता फक्त ५० लोकांसाठी संमेलन घेणे उचित होणार नाही . किमान एक हजार साहित्यिक , वाचक ,श्रोतेगण या संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध  राज्यात लागू झाल्यामुळे कांही कालावधीसाठी संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.


पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल.सर्व साहित्यप्रेमींनी व संयोजन  समिती मधील सर्व सदस्यानी याची नोंद घ्यावी असे  आवाहन बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे आणि संयोजन समितीचे मारुती बनसोडे यांनी केले आहे.
 
Top