नळदुर्ग , दि . १३

येथील उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्यासाठी मनसेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जात आहे,संबंधित विभागास पत्रव्यवहार, अनेक आंदोलने केली . परंतु अद्याप पर्यंत रुग्णालय सुरु झाले नाही,सद्यस्थितीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असून शहर व परिसरात कोणतेही  शासकीय अथवा खासगी सुसज्य व सुविधा असलेले रुग्णालय नसल्याने हे रुग्णालय तात्काळ सुरु होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन रुग्णालयाच्या बाबतीत उदासीन का आहे? हा प्रश्न आहे .रुग्णालयाचे जवळपास काम पूर्ण झाले असून, स्टाफची नियुक्ती झाली आहे. वारंवार निवेदने, आंदोलने करून ही प्रशासन जर दुर्लक्ष करीत असेल तर या इमारतीचा सर्वसामान्य नागरिकांना काय उपयोग? असा सवाल मनसेने केला आहे.


नळदुर्ग शहराला राष्ट्रीय महामार्ग लाभलेले असून त्या महामार्गावर सतत अपघात होतात, अपघातग्रस्ताना वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकजन दगावले आहेत,त्यात सद्या कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत आहे. किमान आता तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु झाले पाहिजे . परंतु तशी काही हालचाल प्रशासनाची दिसत नाही. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येत्या १५ दिवसात,म्हणजेच येत्या२६ जानेवारी पर्यंत हे रुग्णालय सुरु करावे अन्यथा दि.२८ जानेवारी रोजी मनसेच्या वतीने आरोग्य मंत्री यांच्या पूतळ्यास रुग्णालयाच्या इमारती वरुन कडेलोट करण्यात येईल असा इशारा नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक  पोलिस निरीक्षक यांच्या मार्फ़त जिल्हाधिकारी यांना मनसेने दिला आहे. 


निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांच्या स्वाक्ष-या  आहेत.
 
Top