वागदरी , दि. १३
नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे साहय्यक पोलीस निरीक्षक पदाचा पदभार नुतन सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे यांनी स्विकारलाअसुन त्यांचा भाजपा, रिपाइं (आठवले), पत्रकार संघा सह विविध पक्ष व संख्या संघटनेच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला.
येथील नळदुर्ग पोलीस स्टेशनचे स.पो.नी.जगदीश राऊत यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरचे तालुका अध्यक्ष अरूण लोखंडे, पत्रकार संघाचे नूतन मंत्रालयीन संपर्क प्रतिनिधी प्रकाश गायकवाड,भाजपा मिडिया विभाग तालुका अध्यक्ष किशोर धुमाळ, रिपाइं (आठवले)चे एस.के.गायकवाड, सुरेश लोंढे, आरविंद लोखंडे, अनिल वाघमारे, महादेव कांबळे,माजी सैनिक मधुकर लोखंडे,सह विविध पक्ष,संख्या,संघटना, पत्रकार संघा सह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते ,नागरिक आदींनी सत्कार केला.