चिवरी , दि ३१
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जगन्नाथ काशिनाथ सूर्यवंशी ( वय ६०) यांचे दि.३१ रोजी सोलापूर येथे सकाळी अपघाती निधन झाले आहे, ते येथील ग्रामपंचायतीचे निवृत्त शिपाई तथा नाट्य कलाकार होत, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे, त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.