जळकोट, दि.३१ : मेघराज किलजे 

   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर, जळकोट ता . तुळजापूर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे सक्रीय सदस्य  तुकाराम निंबण्णा कुंभार यांनी आपल्या कु. प्रणिता  या कन्येचा वाढदिवस दोन  पाम वॄक्षाच्या रोपांची लागवड करून व संवर्धनासाठी लोखंडी जाळ्या बसवून व   कोरोना नियमांचे पालन करून नवोदय परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी जादा तासास उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. 

यावेळी शाळेच्यावतीने मुख्याध्यापक  डी.एस  रेणूके  यांनी कु. प्रणितास वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पालकांचे आभार मानले. यावेळी शाळेतील शिक्षक   दयानंद सोनवणे , मुरमुरे जी.के., डी.एस वनवे , नाना क्षिरसागर , श्रीमती एम.एस. रेणूके , श्रीमती महानंदा महामुनी ,श्रीमती एस.एस. भोसले आदी  उपस्थित होत्या. तुकाराम निबंण्णा कुंभार यांनी राबविलेल्या उपक्रमाचे  कौतुक व आभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  शकील  मुलानी यांच्यासह पालक वर्गातून होत आहे.
 
Top