तुळजापूर , दि . ०५



तुळजापूर येथील माऊली महिला बचत गट व सई महिला बचत गट यांच्या वतीने येथील माऊली नगरमध्ये बुधवार दि.( 5)  रोजी सायंकाळी  अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाने मातृतुल्य व्यक्तीमत्व हरपल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.  यावेळी माऊली  व सई महिला बचत गटातील सदस्या उपस्थित होत्या.
 
Top