नळदुर्ग , दि .०५

 नळदुर्ग  येथील हिंदूहृदयसम्राट स्वा.सावरकर युवा मंचच्या २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  पत्रकार भैरवनाथ कानडे यांच्या हस्ते  प्रकाशन करण्यात आले. 


नळदुर्ग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक वर्षी अद्ययावत अशी वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असुन  वैविध्यपुर्ण माहिती व संग्राहय अशी वार्षिक दिनदर्शिका  २०२२ यादिनदर्शिकेचे प्रकाशन  पत्रकार तथा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांच्या हस्ते करण्यात आले . 


यावेळी कानडे यांना मुंबई येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचा  राज्यस्तरीय बेरोजगार मुक्त पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष  प्रमोद कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ.आनंद काटकर, मराठी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक प्रा डॉ..पंडित गायकवाड, आरोग्य विभागातील धोंडीराम कदम ,खुदावाडी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाप्पा जवळगे आदीं उपस्थित होते.
 
Top