नळदुर्ग , दि . ७
दर्पण दिनानिमित्त युनिटी मल्टीकॉन्स प्रा.लि.च्या वतीने नळदुर्ग शहरातील सर्व पत्रकारचा सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, युनिटी कंपनीच्या माध्यमातून नळदुर्गचा भुईकोट किल्ला विकसित केलाआणि हे करण्याचं भाग्य मला मिळाले आणि या कामात मला पत्रकारांचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने नळदुर्ग शहरातील पत्रकारांना सहकुटुंबं किल्ला पाहण्यासाठी मोफत पासची घोषणा कफील मौलवी यांनी केली.पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. त्यांच्यामुळेच समाजात जे चांगल वाईट घडतंय ते आपल्यापर्यंत पोहचतो असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाघाट कॉलेजचे प्राचार्य संजय कोरेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून युनिटी मल्टीकॉन्सचे कार्यकारी संचालक कफील मौलवी माजी नगरसेवक बसवराज धरणे , भाजपाचे माजी शहाराध्यक्ष पद्माकर घोडके, नळदुर्ग सराफ संघटनेचे अध्यक्ष मुकुंद नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे आदी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व पाहुण्याचे स्वागत कफील यानी केले.
यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, सचिव सुनिल गव्हाणे, . उपाध्यक्ष आयुब शेख, श्रीनिवास भोसले, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक, सदस्य जेष्ठ पत्रकार विलास येडगे, सुनिल बनसोडे,तानाजी जाधव,लतिफ शेख, उत्तम बनजगोळे, इरफान काझी, दादासाहेब बनसोडे, अजित चव्हाण, शोएब काझी, मुजम्मील शेख, किशोर नाईक, प्रा. पांडुरंग पोळे आदिंचा शाल श्रीफल सन्मानपत्र व बुके देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विनायक अहंकारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुबेर काझी व युनिटी मल्टीकॉन्सचे सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.