काटी , दि . ८
आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघातील पत्रकार बांधव ,पत्रकार उमाजी गायकवाड, सर्जेराव गायकवाड, भिमा भुईरकर, गणेश गायकवाड यांचा सत्कार पिंपळा (खुर्द) येथील सहशिक्षक विठ्ठल नरवडे यांच्या वतीने प्रत्यक्ष भेटी देऊन शाल,फेटा, पुष्पगुच्छ, व पेढा भरवून सत्कार केला.
पत्रकारिता हे समाजसेवेचे व्रत असून अतिशय प्रामाणिकपणे समाज सेवा करण्याची जबाबदारी पत्रकार बांधव करीत असतात . तसेच लोकशाहीला अधिक बळकटी देऊन संस्कारक्षम व सृजनशील समाजनिर्मिती करिता पत्रकारांचा मोलाचा सहभाग असल्याचे मत सहशिक्षक विठ्ठल नरवडे यांनी व्यक्त केले. विठ्ठल नरवडे यांनी पत्रकार उमाजी गायकवाड यांच्या तुळजापूर येथील निवासस्थानी जावुन व तामलवाडी ग्रामीण पत्रकार संघातील सदस्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन पत्रकारांच्या प्रति आदर, स्नेहभाव व्यक्त केलेल्या सत्काराबद्दल पत्रकार उमाजी गायकवाड यांनी सहशिक्षक विठ्ठल नरवडे यांचे आभार मानले.