काटी , दि . २८
काटी ता. तुळजापूर येथील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने बसस्थानक शेजारील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयासमोर आकर्षक रांगोळी काढून राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा!” असे घोषवाक्ये देणारे स्वातंत्र्य काळातील थोर क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस आणि महान क्रांतिकारक सरदार भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हास्ते करुन प्रजासत्ताक दिन उत्सर्फुतपणे साजरा करण्यात आला.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे, माजी सैनिक श्रीकांत गाटे, सेवानिवृत्त मेजर सुभेदार जगदेवराव खपाले, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, व्हाइस चेअरमन भागवतराव गुंड आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या थोर महापुरुषाबद्दल आदर, सन्मान, प्रेम व्यक्त करत "भारत माता की जय" च्या जयघोषात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे म्हणाले की, देशाच्या रक्षणासाठी सिमेवर भारतीय सैनिक ऊन, वारा, थंडी ,पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र डोळ्यात अंजन घालून सेवा बजावत असतात. देशाच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. भारतीय सैनिकांमुळे देशातील प्रत्येक नागरिक बिनधास्तपणे जीवन जगत असल्याचे सांगून देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतरही येथील माजी सैनिक वेगवेगळ्या माध्यमातून देशसेवेला हातभार लावतात, गावातील माजी सैनिक एकत्रितपणे ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी, पोलीस स्टेशन, शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात, माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयास केलेल्या रंगरंगोटीबाबत व त्यांच्या कार्याबाबद्दल पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी कौतुक करुन भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून वाढत्या स्पर्धेच्या युगात योग्य मार्गदर्शन व नियोजन नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी कमी पडत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अभ्यासकेंद्र, पोलीस ॲकॅडमी केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करुन त्याकामात काही मदतीची गरज भासल्यास निश्चितपणे मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन विक्रमसिंह देशमुख, सरपंच आदेश कोळी, प.स. सदस्य रामहरी थोरबोले, व्हाइस चेअरमन भागवतराव गुंड, माजी सैनिक श्रीकांत गाटे, माजी सुभेदार मेजर जगदेवराव खपाले, प्रदीप साळुंके, माजी सैनिक इजदानी बेग, विलास गाटे, संतोष थिटे, जयसिंग आगलावे, विठ्ठल क्षिरसागर, अतुल सराफ, संजय महापुरे,अशोक जाधव, रामेश्वर लाडुळकर, रावसाहेब गुंड, बाळासाहेब लोंढे, सचिन साळुंके,दादा गाटे, महेश गाटे, वैभव गुंड, काका लेंगरे, गोपाळ चिवरे, मनोज गाटे, माऊली लोहार, विकास खरात, प्रथमेश गुंड, शुभम काटे आदी मान्यवर उपस्थित होते.