वागदरी , दि . १५ :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा २८ वा नामविस्तार वर्धापन दिन वागदरी ता.तुळजापूर येतथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी पंचशील बौद्ध विहार कमिटी वागदरीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच नागनाथ बनसोडे, विद्यामान उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, महिला बचत गटाच्या उज्वला वाघमारे, लक्ष्मी वाघमारे, गीताबाई झेंडारे आदींच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन आभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना रिपाइं (आठवले)चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड म्हणाले की, विद्यापीठ नामांतर लढ्याचा संघर्षमय इतिहास हा चळवळीतील कार्यकर्त्याना प्रेरणा देणारा असून नामांतर लढ्याचा विजय म्हणजे आंबेडकरी जणतेच्या आस्मितेचा विजय होय.
यावेळी अनिल वाघमारे, भिमशाहीर शिवाजी वाघमारे, कुंडलीक वाघमारे,आकाश झेंडारे,सुर्यकांत वाघमारे,पांडुरंग बनसोडे, आप्पा भंडारे,धम्मदीप बनसोडे, सुशिल झेंडारे,माजी उपसरपंच कविता गायकवाड, वंदना वाघमारे, श्रीदेवी वाघमारे, सुगंधा वाघमारे, ठकुबाई वाघमारे, गेंदाबाई बनसोडे आदी महिला ,युवा कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन एस.के.गायकवाड यांनी केले.याप्रसंगी विद्यापीठ नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भिमसैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून सामुदायिकरित्या तिळगुळाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.