अक्कलकोट , दि. १६ :
अक्कलकोट स्वामी दर्शनासाठी पुण्याहून सायकलने प्रवास करणारे सुग्रीव सूर्यवंशी व सारंग हळदीकर याचे स्वागत व सत्कार अक्कलकोट घडामोडी ग्रुपकडून शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
यवेळी अक्कलकोट घडामोडी सदस्य अरुण अळविकर ,अनिल चौगुले याच्या हस्ते सत्कार करण्यात आले. मिडीया नियंत्रक स्वामींनाथ चोगुले ,रुद्रय्या स्वामी ,बाळू पवार, श्रीनिवास दाते ,ईशान जाधव व अक्कलकोट घडामोडी परिवारांचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुग्रीव सूर्यवंशी व सारंग हळदीकर अक्कलकोट घडामोडीचे आभार व्यक्त केले.सत्कारांने भाराहून गेलो आहोत.असे सत्कार स्वागत अपेक्षित नव्हते.स्वामी दर्शनासाठी पुण्याहून अक्कलकोट पोहचलो ही इच्छा पूर्ण झाली.