इटकळ , दि. १५

तुळजापूर तालुक्यातील इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पोलिस पाटील यांचा गौरव व दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली.  दि .१४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या  दिवशी इटकळ येथील विवंता सेलिब्रिशेन हाँलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.


नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या दुरक्षेञ इटकळ पोलिस चौकी अंतर्गत येणाऱ्या १७ गावच्या पोलिस पाटील यांचा शाल ,सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र , देऊन सन्मान करण्यात आला.कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी पोलिस प्रशासन व महसूल विभागासोबत केलेल्या कार्याची पावती म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, डॉ रामदास ढोकळे, माजी जि . प . वसंत वडगावे‌,अझर मुजावर, राहुल बागडे, रईसा नदाफ या़च्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी दिनेश सलगरे, केशव गायकवाड, लियाकत खुदादे, नामदेव गायकवाड , बालाजी गायकवाड,चाॅद शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.


 
Top