तुळजापूर , दि . १६ 

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित, विश्वगामी माध्यमिक शिक्षक संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी तुळजापूर तालुक्यातील तिर्थ बु. येथील महाराष्ट्र विद्यालयातील  शिक्षक तानाजी सयाजी म्हेत्रे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 
प्रदेशाध्यक्ष  बापूसाहेब अडसूळ यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.       

  
या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा सल्लागार दत्तात्रय नन्नवरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष मुळे,तुळजापूर तालुका शिक्षक सदस्य किसन क्षीरसागर,जीवन उमरे,गवळी,औंढेकर तसेच तुळजापूर तालुका पत्रकार संघ सदस्य उपस्थित होते. यावेळी तानाजी म्हेत्रे यांनी संघाच्या माध्यमातून शिक्षकाचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असे मत व्यक्त केले.
 
Top