मुरुम दि . १६
उमरगा तालुक्यातील मुरुम येथे लसीकरण मोहिम यशस्वी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मुरूम येथे दि. 15 जानेवारी 2022 रोजी 15 ते 18 वर्षे वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी "कोव्हॅक्सीन" लसीचे आयोजन ग्रामीण रुग्णालय मुरूम यांच्या वतीने करण्यात आले. या लसीकरणा मध्ये 175 विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले .
या लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका श्रीमती माया गायकवाड , डेटा एन्ट्री ऑपरेटर कु.केवल कांबळे व त्यांचे सहकारी यांनी विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन लसीचा डोस दिला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य इंगोले डी.टी., राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी माने के. बी, उपासे जी.डी , प्रा, बेलकोणे, श्रीमती बेलकेरी , हुलगुंडे ,प्रा.विनय इंगळे प्रा. रोहन हराळकर प्रा.गोविंद इंगोले, प्रसाद इंगोले, प्रा.श्रीकांत शिंदे , क्रिडा शिक्षक बी.आर.इंगोले व सर्व सहकारी प्राध्यापकांनी ही लसीकरण मोहिम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.तसेच डॉ. डुकरे अधिष्ठाता ग्रामीण रुग्णालय मुरूम याचे विशेष सहकार्य लाभले.