नळदुर्ग दि. १७ : 
 
सर्वत्र संसर्गजन्य  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांनी सानीटॕझर, मास्कचा वापर करुन नियमाचे पालन करावे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नळदुर्ग (मैलारपूर येथील) श्री खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविक भक्तांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी राजपूत समाजाच्या दिनदर्शीकेच्या प्रकाशन प्रसंगी केले . 


महाराणा प्रताप बहुउद्देशिय सामाजिक संस्था नळदुर्ग संचलित रजपुत समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन व नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार धरणे कॉम्प्लेक्स याठिकाणी सोमवार दि. १७ जानेवारी रोजी करण्यात आले. व्यासपिठावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर गोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज काझी, नगरसेवक बसवराज धरणे, नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, सिद्रामप्पा मुळे, आदिजण उपस्थित होते.


यावेळी नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, उपाध्यक्ष आयुब शेख, सचिव सुनिल गव्हाणे, कोषाध्यक्ष भगवंत सुरवसे, प्रसिध्दी प्रमुख शिवाजी नाईक, नुतन सहाय्यक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर गोरे यांचा सत्कार करण्यात आला. 


या कार्यक्रमास महाराणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष  सुधीर हजारे , युवा अध्यक्ष मनिष हजारे, राहुल हजारे, अतुल हजारे, शुभम हजारे, आमर बेसेनी , रवी ठाकुर , विजय ठाकुर, किरण ठाकुर , मानसिंग ठाकुर, बालसिंग चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , भाजपाचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके , श्रमिक पोतदार, शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख  बंडाप्पा कसेकर , पत्रकार मित्र अमर भाळे, जेष्ठ पत्रकार विलास येडगे,  अजित चव्हाण , लतीफ शेख, शोएब काझी ,  जमनसिंग ठाकुर , मानसिंग ठाकुर , बालाजी ठाकुर , संदिप हजारे, मोकाशे सुरेश, सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश हजारे , प्राताविक सरदारसिंग ठाकुर, जमनसिंग ठाकुर , मानसिंग ठाकुर , बालाजी ठाकुर आदिजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, प्रास्ताविक, आभार सरदारसिंग ठाकुर यांनी मानले.
 
Top