काटी , दि . १७ : 

 मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व परिसरातील पोलीस पाटील यांचा कोरोना काळातील भरीव योगदानाबद्दल मंगरुळ ता . तुळजापूर येथिल लक्षण माळी यांचा  सन्मान करण्यात आला. याबद्दल माळी यांचे आभिनंदन केले जात आहे.

 यावेळी तुळजापूर तालुक्यातील  मंगरूळ येथील लक्ष्मण राजेंद्र माळी या तरुण पोलीस पाटील यांना सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र , पुष्पगुच्छ , शाल व पेन देऊन गौरविण्यात आले.


 यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे , जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे , माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे , यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  

 
Top