जळकोट, दि.२ : मेघराज किलजे
षटकोळी साहित्यप्रेमी समूहाचे राज्यस्तरीय पाचवे ऑनलाईन संमेलन आनंदी व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाले.
या संमेलनाच्या अध्यक्षा जेष्ठ कवी, गितकार, पटकथा लेखक गुलाबराजा फुलमाळी, तर प्रमुख पाहुणे कवी, शाहू संभाजी भारती व मिठ्ठू आंधळे हे होते.या संमेलनाचे आयोजन कवयित्री संध्याराणी कोल्हे {षटकोळी निर्मितीकार} यांनी केले होते.
संमेलन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर सर्व अतिथी मान्यवर व सहभागी कवींचे स्वागत संध्याराणी कोल्हे यांनी स्वागत गीतने केले. प्रथम अतिथींचा परिचय कोल्हे यांनी करुन दिला. त्यानंतर तिन्ही अतिथींनी सुंदर शब्दांमध्ये सर्व साहित्यिकांना मार्गदर्शन केले. षटकोळीचे हे ऑनलाईन काव्यसंमेलन दोन भागामध्ये संपन्न झाले. पहिल्या भागामध्ये सहभागी एकूण २४ कवी/कवयित्री यांनी षटकोळी काव्याचे वाचन केले आणि दुसर्या भागामध्ये सर्व कवीवर्यांनी आपापल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले. सर्व षटकोळी व कविता या विविध विषयांवर आधारीत होत्या.
अध्यक्षांनी व प्रमुख पाहुण्यांनी अनमोल असे मार्गदर्शन करुन सर्व कवीवर्यांना प्रोत्साहन दिले. ऑनलाईन संमेलनामध्ये निशा कापडे, बालाजी नाईकवाडे, राजश्री विरुळकर, सुलभा भोसले, सुरज अंगुले, ज्ञानेश्वर नखाते, सारिका बुरसे, भावना गांधिले, प्रकाश पिंपळकर, शहादेव सुरासे, के.बी.शेख , प्रकाश शेंडगे, द.ल.वारे, गीता मदारे, रविंद्र गिमोणकर, स्वाती लोहार, नितीन गायके, सौ.अनुराधा उपासे, सचिन पाटील व स्वतः आयोजक, सुत्रसंचालक संध्याराणी कोल्हे या सर्वांनी आपापल्या षटकोळी व सुंदर कवितांचे सादरीकरण केले. संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे स्वाती लोहारे यांनी ऐ मेरे वतन के लोगो हे गीत सादर केले. तर के.बी.शेख यांनी कमालीचा चेहरा तुझा हे गीत सादर केले. प्रमुख पाहूणे शाहू भारती तरुणांची माथी भडकवणार आहे.ही कविता सादर केली. आंधळे यांनी खरच आहे का इथे प्रजेची सत्ता? हे कवितेतून मांडले .
उपस्थितांचे कोल्हे यांनी आभार मानले आणि सुंदर अशा या संमेलनाची समाप्ती पुन्हा भेटू या या विश्वासाने केली. खूप छान,आनंदी व प्रसन्न वातावरणामध्ये हे षटकोळीचे ५ वे काव्यसंमेलन यशस्वीरित्या संपन्न झाले.