तुळजापूर,  दि. २७ 

तुळजापूर येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत मोठ्या गटामधून शंभूराजे शेळके आणि लहान गटामधून कु. आयुषी केवटे यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले. 


दुपारी चार वाजेपासून सुरू असलेली शिवकालीन वेशभूषा स्पर्धा रात्री साडेनऊ वाजता संपन्न झाली, स्पर्धेसाठी तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिवजयंती निमित्ताने तुळजापूर येथे शिवजन्मोत्सव समिती तुळजापूर संस्कार भारती तुळजापूर व विशाल रोजकरी मित्र मंडळ यांच्याकडून आयोजित केलेल्या शिवकालीन वेशभूषा संवाद स्पर्धेसाठी 114 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. छोट्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन सादर केलेले प्रसंग पाहून उपस्थित शेकडो रसिक श्रोत्यांनी शिवपार्वती मंगल कार्यालय डोक्यावर घेतले. जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी सभागृह दणाणून निघाले. टाळ्यांच्या कडकडाटात सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक झाले.

पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक विशाल रोचकरी, संस्कार भारती जिल्हा अध्यक्ष शामसुंदर भन्साळी, संगीततज्ञ सुरेश वाघमारे, अभाविप माजी प्रदेश उपाध्यक्ष गणेश जळके, नाट्यकलावंत सचिन घोडके, नाट्यकलावंत कु. संगीता कोळेकर ,परीक्षक सौ अश्विनी शिंदे, माजी नगरसेविका दीपाबाई मस्के यांच्या  हस्ते पारितोषिक देण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक विशाल रोचकरी, नगरसेवक पंडित जगदाळे, संस्कार भारती प्रदेश लोककला प्रमुख डॉ. सतीश महामुनी, एनजीओ फेडरेशन राज्य समन्वयक तानाजी जाधव, अध्यक्ष पद्माकर मोकाशे, संयोजक प्रफुल्लकुमार शेटे, कोषाध्यक्ष अविनाश धट, संगीत प्रमुख नागेश धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेच्या मोठ्या गटामधून प्रथम पारितोषिक शंभुराजे जळके, द्वितीय पारितोषिक कुमारी तनवी खडके ,तृतीय पारितोषिक कु. सिद्धि साठे व कु.प्राची जाधव, चौथे पारितोषक स्वरांजली भोसले, पाचवे पारितोषक दुर्गेश्वरी झटे आणि उत्तेजनार्थ पाच अनुक्रमे कुमारी गार्गी कावरे, प्रणव ढेरे, वैष्णवी गुंड,  समर्थ त्रिकोणे,  व तमन्ना शेख यांना देण्यात आले. लहान गटामध्ये प्रथम पारितोषिक कु. आयुषी केवटे, द्वितीय पारितोषिक कु. स्विमीता सोनवणे, तृतीय पारदर्शक अर्णव म्हस्के, चौथे पारितोषक शिवतेज सूर्यवंशी, पाचवे पारितोषक आदर्श शिरसागर उत्तेजनार्थ पाच अनुक्रमे शरयू साळुंखे, शिवम शिरसागर, आराध्या जगताप, समृद्धी सपकाळ, स्वप्नाली पेंदे यांना देण्यात आले. परीक्षक म्हणून नाट्यकलावंत सचिन घोडके, कुमारी संगीता कोळेकर व सहशिक्षक सौ अश्विनी शिंदे यांनी कामकाज पाहिले. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष पद्माकर मोकाशे, अभिषेक लक्षणे, ओंकार लसणे, मयूर शेटे, संतोष डोईफोडे, रोहित भोसले, कुणाल बंडोडकर, यांनी केले. सूत्रसंचालन महामंत्री सुधीर महामुनी व संगीत प्रमुख प्रसाद महामुनी यांनी केले. आभार  प्रफुल्ल कुमार शेटे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत सुलाखे, संदीप रोकडे, सौ अपर्णा शेटे, सौ सविता भोसले, धनाजी साठे, प्रेम दिवटे, राज भोरे, यांनी परिश्रम घेतले.
 
Top