चिवरी , दि . २७ : राजगुरू साखरे

तुळजापूर तालुक्यातील येवती येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि,२६ रोजी  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे कु. मुक्ताई महाराज चाळक व कु. उन्नती ताई महाराज तांबे यांचा जुगलबंदी कीर्तन सोहळा संपन्न झाला. 

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी येवती येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे, समितीतर्फे दि . १९ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तन सोहळ्यास शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष समाधान ढोले, उपाध्यक्ष क्रांतिसिंह तांबे, सचिव ईश्वर नाना शिंदे, सरपंच सौ पुजा अमोल गवळी, उपसरपंच प्रितम गायकवाड, आदींसह गावातील तरुण, महीला, भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत.
 
Top