तुळजापूर, दि.२७
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे कवि कुसुमाग्रज जन्मदिनी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ देशमुख म्हणाले की, मराठी भाषा ही जगातील सर्वोत्तम भाषा पैकी एक आहे,
जैसी दीपांमाझि दिवटी
का तिथींमाझि पूर्णिमा गोमटी
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी, सर्वोत्तम
अशा शब्दांत माय मराठीचे वर्णन करता येईल, मराठी भाषा शोभिवंत आहे,व्यक्तीमत्व घडविण्याची शक्ती मातृभाषेत असते,खरे पहाता मराठीचे सामर्थ्य हे तिच्या व्यवहरात दिसून येते,ज्ञान आणि विद्येचा प्रसार फक्त मातृभाषेतून होत असतो, त्यामुळे जनभाषा या ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे,माय मराठचा अभिमान बाळगताना इतर भाषेचा अनादर होता कामा नये,भाषा व्यवहारामध्ये शुध्दतेच्या कर्मकांडामध्ये भाषा अडकू नये.मराठी भाषेचा प्रचारासाठी साहित्यामध्ये भाषांतर प्रक्रीया वाढीस लागणे गरजेचे आहे,मराठी भाषा शिक्षण शाळा महाविद्यालये व विद्यापीठे अशा विविध स्तरावरुन नियोजन बध्द पध्दतिने प्राप्त होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर म्हणाले की, मायबोली मराठीच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न गरजेचे आहेत, मराठी साहित्यिकांमध्ये आजतागायत एकुण चार लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे, साहित्य विश्वात सुखात्मक साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे, आपल्या साहित्यात नायक विजयी होत असतो तर खलनायक आपल्या कर्मामुळे पराजित होत असतो सत्य मेव जयते चे संस्कार भारतीय संस्कृती शिकवते त्या मुळे साहित्य, सिनेमा मध्ये शेवटी सत्या चा विजय मनाला समाधान देतो. दुःखातमक .शोक नाट्य शेवट मनाला बरं वाटत नाहीआणि ही आपली परंपरा देखील आहे,मराठी भाषेचा वापर व्यवहारात झाला तरच तिचे आयुष्य वाढीस लागेल.भाषा व्यवहारात न्युनगंड नको,आपण भाषेला मर्यादेत बांधू शकत नाहीत,भाषा विकासासाठी अन्य भाषेचे शब्द स्विकारावे लागतील, वाचन संस्कृती वाढीस लागली तर भाषा विकासाला निश्चित बळ मिळेल,आज जागतिकीकरणाच्या काळात एका व्यक्तीला कमीतकमी दोन भाषा येणे गरजेचे आहे, आधुनिक काळात भाषेचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोहन कांबळे यांनी तर आभार प्रा.डॉ.रामा रोकडे यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.