जळकोट ,दि . १०
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचे (गोकुळ शुगर ) चेअरमन सुनील चव्हाण यांची उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्ल त्यांचा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोटचे सरपंच अशोक पाटील, काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष सिद्रामप्पा मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सोमवंशी, दशरथ काटे गुरुजी, संजय वाघोले, किसान काँग्रेसचे संघटक धनराज पाटील, रामचंद्र थिटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.