चिवरी , दि . १० : राजगुरू साखरे


 तुळजापूर तालुक्यातील येवती येथील शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी समाधान तानाजी  ढोले,तर उपाध्यक्षपदी क्रांतिसिंह तानाजी तांबे यांची निवड करण्यात आली आहे. 


येवती येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि, ८ रोजी शिवजन्मोत्सवा निमित्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस गावचे सरपंच सौ.पूजा अमोल गवळी उपसरपंच  प्रीतम प्रभाकर गायकवाड, युवा नेते अमर तांबे यांच्या उपस्थितीत पार पडली, बैठकीत नुतन कार्यकारिणीची निवड  करण्यात आले. यामध्ये समाधान ढोले  यांची अध्यक्षपदी बिनविरोध चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारणीत सचिवपदी ईश्र्वर  शिंदे, अनुमोदन भरगंडे, कालिदास पाटील, ज्ञानेश्वर कांबळे ,बबलू शिंदे, गोपाळ बडूरे, आकाश तांबे ,राम शिंदे, सोमनाथ घाडगे, आबा शिंदे, यांची निवड करण्यात आली. 

या बैठकीस ज्येष्ठ मंडळी रोहिदास शिंदे, अनिल शिंदे, उमाकांत शिंदे, सुरेश गवळी, विलास भोसले, पिंटू ढोले, मुकुंद गवळी, श्रीकांत हजारे, श्रीकांत तांबे, अमर भरगंडे, जयवंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top