नळदुर्ग , दि . १६ : विलास येडगे
नळदुर्ग येथे दि.१६ फेब्रुवारी रोजी श्री संत रोहिदास चर्मकार समाज सेवा मंडळाच्या वतीने संत शिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली.
बुधवार दि.१६ फेब्रुवारी रोजी संपुर्ण देशात संत शिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. नळदुर्ग येथेही श्री संत रोहिदास चर्मकार समाज सेवा मंडळाच्या वतीने संत शिरोमणी गुरू रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी गुरू रविदासांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे पद्माकर घोडके, युवा सेनेचे माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,माजी नगरसेवक सुधीर हजारे,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनजगोळे,सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे,विजय ठाकुर, चर्मकार समाज सेवा मंडळाचे शहर अध्यक्ष शंकर वाघमारे, सौदागर इंगोले, अमोल कांबळे, बाबू गायकवाड व महेश वाघमारे आदीजन उपस्थित होते.