वागदरी , दि . १२: एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील वाणेगाव ते वडगाव (देव) शिव रस्त्यवरील अतिक्रमण काढून रस्ता सर्वासाठी खुला करावा या शेतकऱ्याच्या मागणीकडे गेल्या१६ वर्षांपासून महसुल प्रशासनाने   दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी वैतागलेल्या वडगाव (देव) ता.तुळजापूर येथील कमलाकर राजमाने या शेतकऱ्यांने दि.२१फेब्रुवारी २०२२ रोजी तहसील कार्यालय तुळजापूर येथे आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला आहे.
  

 तुळजापूर तालुक्यातील  वाणेगाव ते वडगाव (देव) जाणाऱ्या शिव रस्त्यावर वडगाव (देव) येथील एका  शेतकऱ्याने  अतिक्रमण करून द्राक्ष बागेसाठी लोखंडी अंँगल रोवून द्राक्ष बागेची लागवड करून रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे त्या रस्त्याच्या पलीकडे शेजमीन असलेले शेतकरी कमलाकर माणिक राजमाने रा.वडगाव देव सह अन्य शेतकऱ्यांना रस्त्याच्या दुतर्फा बाजूने कोंडी झाली आहे. त्यामुळे आपल्या शेतात  जाण्या - येण्यासाठी व  शेतातील माल बाजारात विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी मोठी आडचण निर्माण झालेली आहे. 


 गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खुला करावा याकरिता कमलाकर राजमाने हे तुळजापूर  तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. माञ याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
महसुलच्या  व संबधित शेतक-यांच्या मनमानी कारभार आणि   त्रासाला कंटाळून  दि.२१फेब्रुवारी २०२२ रोजी तुळजापूर तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे कमलाकर राजमाने यानी निवेदन संबंधिताना  दिले आहे.
 
Top