जळकोट, दि.६ : 


येथून जवळच असलेल्या जळकोटवाडी( नळ) ता . तुळजापूर गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलात वीस वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले  सैनिक भागवत दत्तात्रय पवार यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.



यावेळी सरपंच शिवाजी कदम, माजी सैनिक दाजीबा काळे, भिवाजी इंगोले, बाळू कदम, दत्तात्रय पवार, नागनाथ साळुंके, धनंजय कदम, नागनाथ पवार आदि माजी सैनिक, ग्रा. पंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top