नळदुर्ग , दि . ६  अजित चव्हाण


राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५२ नळदुर्ग -  अक्कलकोट या रस्त्याची संयुक्त मोजणी करीत असताना शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देऊन   न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे करण्यात यावे, या  रस्त्याची संयुक्त मोजणीसाठी शेतकऱ्यांनी दि. २८ मार्च २०१९ रोजी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून संबंधित क्षेत्राची संयुक्त मोजणी करून संपादित क्षेत्र ७/१२  वरून कमी करून त्यांचा मावेजा देण्यात यावा ,यासाठी नळदुर्ग ते अक्कलकोट जवळपास ३०० ते ३५० शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी  याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे दि. २०/०१/२०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठने दोन महिन्याच्या आत संयुक्त मोजणी करण्याबाबत  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना आदेशित  केल्याची माहिती  शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने रवार दि. ०६/०२/२०२२ रोजी नळदुर्ग येथे पत्रकार परिषदेत दिलीप जोशी यांनी दिली. 



शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने   न्यायालयाचे आदेशाचे पालन करत  जिल्हाधिकारी  उस्मानाबाद  यांनी  २७/११/२०२० रोजी टास्क फोर्सची निर्मिती उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली गाव नकाशा नुसार अस्तित्वात असलेल्या रस्त्याची जुनी रुंदी तसेच जुन्या रस्त्यावर असलेल्या फुलांच्या रुंदीच्या अनुषंगाने असलेल्या रस्त्याची रुंदी संबधित खातेदार व त्यांच्या उपस्थित स्थळ पाहणी करून पंचनामा करण्यात आले होते.


 त्याप्रमाणेच रस्त्याची जुनी रुंदी ग्राह्य  धरून नवीन रस्त्याबाबत निविदा प्रक्रिये  प्रमाणे करण्याबाबत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत  मागणी करण्यात आली. तसेच  जिल्हाधिकारी  यांना राष्ट्रीय महामार्गाच्या  सीमाकंन करत असताना नवीन रस्त्याबाबत निविदा प्रक्रिये प्रमाणे सीमाकंन करण्यात यावे अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने यावेळी  करण्यात आली. 

 अर्जुन खोतकर  माजी पालकमंत्री उस्मानाबाद , प्रा. रविंद्रजी गायकवाड माजी खासदार,    खासदार ओमराजे निंबाळकर   देवानंद  रोचकरी ,  आशोक  जगदाळे ,  कमलाकर  चव्हाण  यांनी शेतकऱ्यांना सहकार्य केले. तसेच  ॲड. संभाजी टोपे, ॲड. गजानन चौगुले, ॲड. संतोष कुलकर्णी,  ॲड. देशपांडे यांच्यासह नळदुर्ग पोलिस ठाण्याचे  तत्कालीन  सहाय्यक पोलिस निरीक्षक  जगदीश राऊत ,  पोलिस उपनिरीक्षक सुधीर  मोटे  आदीनी वेळोवेळी शेतकऱ्यांना सहकार्य केल्याचे सांगुन जोशी  यानी त्यांचे आभार मानले .


या  पत्रकार परिषदेस  दिलीप जोशी, व्यंकट पाटील, चंद्रकांत शिंदे,  विक्रम निकम, सरदारसिंग ठाकुर ,  संतोष फडतारे,  काशिनाथ काळे, संतोष शिकरे,  बंडू मोरे, तोलू पाटील, पंडित पाटील, शिवराम लोहार, पंडित निकम,शिवराम निकम, नरसिंग निकम, इत्यादी शेतकरी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
 
Top