नळदुर्ग , दि . ६ : विलास येडगे

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दि.६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. लतादीदींच्या निधनाचे वृत्त समजताच संपुर्ण देश शोकसागरात बुडाला. नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
       


लता मंगेशकर या भारतरत्न होत्या. आपल्या मधुर व गोड आवाजाने त्यांनी कलाक्षेत्रात भारताचे नाव जगात आजरामर केले. गेल्या २९ दिवसांपासुन त्यांच्यावर ब्रीचकॅन्डी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र दि.६ जानेवारी रोजी त्यांनी उपचार सुरू असतानाच अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनाची बातमी समजल्या नंतर संपुर्ण देश शोकसागरात बुडाला.
      

 लतादीदींच्या निधनाचे वृत्त समजताच नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेने बैठक घेऊन लतादीदींना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे हे होते. यावेळी पत्रकार संघटनेचे सचिव सुनिल गव्हाणे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक, सदस्य विलास येडगे, तानाजी जाधव, उत्तम बनजगोळे, लतिफ शेख, दानिश शेख, अजीत चव्हाण, दादासाहेब बनसोडे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
 
Top