नळदुर्ग , दि .२६ : विलास येडगे
नळदुर्ग परीसरात पळस फुलाने बहरल्याने नागरीकांना उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाळ्यात डोंगर--माळरानावर पळस फुलाने बहरलेला पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडून घेतल्यासारखे आहे . डोंगर - माळरानावर पळस फुलाने बहरू लागला की समजायचे आता उन्हाळा सुरू होणार.
फुलाने बहरलेला पळस अतीशय सुंदर दिसतो. केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेला पळस पाहणे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडून घेण्यासारखे आहे. निसर्गाचा हा एक चमत्कारच आहे. या फुलांपासून रंगही बनविला जातो.पुर्वी रंगपंचमीला या पळसाच्या फुलांचाच रंग केला जायचा. हा रंग अतीशय गडद व शरीराला कुठल्याच प्रकारचा अपाय न करणारा म्हणुन ओळखला जायचा. पळसाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळ्याही बनविल्या जातात.सध्या नळदुर्ग परीसरात पळस केशरी फुलाने बहरून गेल्याचे दिसुन येत आहे.