अणदूर , दि . २६ :
शेतकरी, कष्टकरी, कामगार, व इतर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी, तसेच त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या विविध योजनेचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी मंत्री, मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करीत आहेत,
माजी मंञी मधुकरराव चव्हाण यानी तुळजापूर तालुक्यातील चिवरी, उमरगा, येवती, आरबळी ,आरळी(बु.) या गावांचा दौरा केला व तेथील जनतेशी संवाद साधून विचारपूस केली तसेच अनेक शासकीय तक्रारी चे ताबडतोब निवारण केले,या दौऱ्याला जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सलग 25 वर्ष आमदार असणारे, जनतेशी डायरेक्ट संपर्क असणारे चव्हाण हे छोट्या छोट्या वाडी वस्तीवर या वयात फिरत असल्याने कौतुक जनतेतुन होत असून आपल्या विविध तक्रारी ते त्यांच्या पुढे मांडत होते, असा दररोज संपर्क दौरा संपूर्ण तुळजापूर विधान सभा मतदार संघात असणार असून रोज 4 ते 5 गावे करून जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.